MLA Disqualification Case : संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर कारवाई होणार?; नितेश राणेंकडून विशेषाधिकार भंगाची सूचना

71
MLA Disqualification Case : संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर कारवाई होणार?; नितेश राणेंकडून विशेषाधिकार भंगाची सूचना

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) सुनावणी सुरू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत आणि अंबादास दानवेंविरोधात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली आहे. त्यामुळे ‘उबाठा’ गटाच्या या दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्‍वये राणे यांनी विधिमंडळ (MLA Disqualification Case) सचिवालयाकडे विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली आहे. त्यात नितेश राणे म्हणतात, ‘राज्यसभा सदस्‍य संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी नजिकच्‍या काळात विधानसभा अध्यक्षांसंदर्भात काही वक्‍तव्‍ये केली. ‘’संविधान, कायदा व विधिमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्‍मक पदावर बसलेले विधानसभा अध्‍यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?’’, ‘’आम्‍ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्‍यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्‍याशिवाय रहाणार नाही.’’, ‘’विधानसभा अध्‍यक्ष फुटले आहेत’’, ‘’उशीरा न्‍याय देणे हा सुध्‍दा अन्‍याय असतो आणि तो अन्‍याय विधानसभा अध्‍यक्ष करीत आहेत’’, अशा वक्तव्यांचा त्यात समावेश आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवारी होणार दुसरी सुनावणी)

विधानसभा अध्यक्षांसमोर (MLA Disqualification Case) सध्‍या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्‍ये उपरोक्‍त दोन्‍ही व्‍यक्‍तींचे राजकीय हितसंबंध आहेत. या पार्श्‍वभूमीवर वर नमूद वक्‍तव्‍ये करुन त्‍यांनी विधानसभा अध्‍यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्‍याची कृती केली असून त्‍याद्वारे विधानसभा अध्‍यक्षांचा व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या हिताकरिता या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संजय राऊत व अंबादास दानवे यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्‍काळ सुपूर्द करावे व त्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.