नवाब मलिक नावापुरते राहणार मंत्री!

99

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून होत आहे, मात्र महाविकास आघाडीने यावर नकार देत मलिक यांचे मंत्रीपद कायम ठेवले आहे. परंतु मलिक यांना जामीन मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव मलिक यांच्याकडील खात्याचा पदभार आता अन्य मंत्र्यांवर सोपवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे मलिक काही दिवसांनी नावापुरते मंत्री राहणार आहेत.

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. तर दुसरीकडे भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अशाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा मुख्यमंत्री म्हणतात शिवजयंती तिथीनुसार, सरकार मात्र तारखेवरच ठाम!)

मलिकांची मंत्रीपदे अशी विभागली

नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

का घेतला पवारांनी निर्णय?

नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या खात्यातील काम मागे पडू नये म्हणून त्यांच्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.