उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…

256
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…

Nitesh Rane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १९ एप्रिल रोजी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी ही ऑफर स्वीकारण्यास होकार दिलाय. मात्र, या संभाव्य युतीवर भाजपाचे मंत्री तथा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे, यात कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. हे विधान राज ठाकरे यांनी केले. तसेच उद्धव ठाकरेंनी देखील मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे वक्तव्य केले आहे. यावर भाजपा आमदार व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nitesh Rane)

(हेही वाचा – 33 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे केंद्रिय मंत्री Amit Shah यांनी सुरक्षा दलाचे केले अभिनंदन; म्हणाले…)

नितेश राणे म्हणाले, मला एक कळत नाही याने काय फरक पडणार? दोघे एकत्र आले काय, किंवा नाही आले काय? महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी कोणी एकत्र येत आहे का? हा स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेत. आम्ही त्यांना जिहादीहृदयसम्राट म्हणतो. म्हणूनच महाकुंभावर टीका करायची आणि उद्धव ठाकरे सारख्याल जिहाद्याला खुश करायचे. हिंदुत्वाच्या विरोधात जेवढे जिहादी विचारांचे लोक आहेत. ते एकत्र येऊन हिंदुत्वाला आव्हान देत असतील, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भाजपा (BJP), हिंदुत्ववादी विचारांचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहोत.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, एकत्र येण्याचा कार्यक्रम हिंदुत्व, मराठी माणसासाठी आहे की, जिहाद्यांना ताकद देण्यासाठी आहे, जे जोर जबरदस्तीने इस्लामीकरण करतात त्यांना ताकद देण्यासाठी आहे. त्या बद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे. हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का? असा सवाल  नितेश राणे उपस्थित केला.

(हेही वाचा – मुस्लिमांच्या अंधश्रद्धांवर गप्प बसणारे दाभोलकर आणि मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार होताना मौन बाळगणारे गांधी एकच; Ranjit Savarkar यांचा हल्लाबोल)

एवढा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा, तिथे जाऊन उर्दूची सक्ती बंद करून मराठीची सक्ती करा. हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलता. हिंदू समाजाच्या लोकांवर का हात उचलता? बेहरामपाड्यात जाऊन सांगा, मराठीची सक्ती करा तिथे. हिंदू समाजाच्या लोकांना का मारताय? हिंदूंमध्ये का फूट पाडता? जिहाद्यांना मदत करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी, असे नितेश राणे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.