पहलगामच्या बैसरन व्हॅलीत (Pahalgam Attack) २२ एप्रिलला बळी गेलेल्या २६ जणांचे स्मारक बांधण्याचा निर्णय मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाने घेतला. पहलगाम येथेच मंत्रिमंडळाची बैठक २७ मे रोजी घेण्यात आली. त्यात निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बैठकीनंतर जाहीर केले. या संभाषणात त्यांनी पर्यटनाशी संबंधित लोकांना आश्वासन दिले की, सरकार पर्यटकांची सुरक्षा आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलत आहे. हे स्मारक केवळ श्रद्धांजलीचे प्रतीकच राहणार नाही तर काश्मीरच्या जगण्याच्या, एकतेच्या आणि शांततेच्या संकल्पाचा संदेशही देईल. (Pahalgam Attack)
हेही वाचा-Veer Savarkar ज्वलंत राष्ट्रवादाचे स्वरुप; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार
महाराष्ट्रातून गेलेल्या पत्रकार आणि पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींनी पहलगामला भेट दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “२२ एप्रिल रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भाने या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा केली. ते म्हणाले की, या हल्ल्यामागचा दहशतवाद्यांचा हेतू आम्ही कधीही साध्य होऊ देणार नाही. या हल्ल्यानंतर इथल्या जनतेने पुढे येऊन दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार केला याचा मला आनंद आहे.” (Pahalgam Attack)
हेही वाचा- Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गावरील मोदीनीती
“या हल्ल्यानंतर पर्यटनाची काय हानी झाली आणि किती रुपयांचे नुकसान झाले ही अत्यंत गौण बाब आहे. ते नुकसान केव्हाही भरून काढता येईल. पण आमचे २५ पाहुणे आणि एक आमचा व्यावसायिक यांनी प्राण गमावले. ते आमच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. या २६ जणांचे योग्य स्मारक उभारण्याचा निर्धार आम्ही तेव्हाच केला होता. आज मंत्रिमंडळाने त्याच्या तपशिलावर शिक्कामोर्तब केले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. (Pahalgam Attack)
२२ एप्रिलचा हल्ला: एक काळी छाया
२२ एप्रिल २०२५ रोजी बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले. पर्यटकांनी भरलेल्या व्हॅलीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात २६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही घटना केवळ मानवी शोकांतिका नव्हती तर राज्याच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटन प्रतिमेवरही खोलवर परिणाम करणारी होती. (Pahalgam Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community