‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळं पुस्तक होईल’; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री Nitesh Rane यांची बोचरी टीका

422
Nitesh Rane : शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ (Narkatla Swarg) या पुस्तकाच नुकतच प्रकाशन झालं. संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) असताना आलेल्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिलं आहे. यावर आता भाजपा कॅबिनेट मंत्री तथा आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. (Nitesh Rane)

(हेही वाचा – Arthur Road Jail : कारागृहाच्या पुनर्विकासाबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश; प्रस्ताव सादर करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश)

नितेश राणे काय म्हणाले?
‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळे पुस्तक होऊ शकते. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन मातोश्रीतला नरक असे होऊ शकते, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. शिवसेना उबाठा प्रचाराच्या शुभारंभावरही त्यांनी टीका केली. उबाठाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की, आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजपा आणि प्रामुख्याने शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी  स्पष्ट करावे आणि नौटंकी बंद करावी. असे मंत्री नितेश राणे यांनी केले.

(हेही वाचा – Shiv Sena UBT कडून चार नवीन उपनेत्यांची नियुक्ती)
‘हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा’
“बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे राज ठाकरे शिवसेना बांधत होते. त्यावेळचा शिवसैनिक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंकडे बघत होता. राज ठाकरेंचा त्यांनी किती वेळा अपमान केला हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा. ‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळं पुस्तक होऊ शकते. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन मातोश्रीतला नरक. त्यावेळी अपमान करायचा आणि रोजी रोटीसाठी राज ठाकरेंना गोंजारत बसायचं असं सुरू आहे” असं नितेश राणे म्हणाले. राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडण मिटून दोन ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. मात्र शेवटी राज ठाकरेंचा जो अपमान झाला, ते सर्वजण विसरले नसतील असं मला वाटतं” असं नितेश राणे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.