Maruti Chitampalli : पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन ; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maruti Chitampalli : पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन ; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास

60

निवृत्त वनाधिकारी, अरण्यऋषी, पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चितमपल्ली (Maruti Chittampalli) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. 30 एप्रिल 2025 रोजी मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिल्लीवरून पद्मश्री पुरस्कार घेवून आल्यावर ते बेड रेस्टवर होते. (Maruti Chittampalli)

हेही वाचा-गेट वे ऑफ इंडिया आणि बधवार पार्कमधील समुद्री कचरा काढण्यासाठी BMC प्रायोगिक तत्वावर करणार रिमोट बोटींचा वापर

मारुती चित्तमपल्ली (Maruti Chittampalli) यांचे वास्तव्य अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज, मनिधारी एम्पायर सोसायटी येथे होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार असून रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता व केवळ दूध व थोडेसे पाणी घेत होते. (Maruti Chittampalli)

हेही वाचा- India-Croatia Ties : भारत आणि क्रोएशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद हा…

चितमपल्ली (Maruti Chittampalli) यांचा जन्म सोलापुरात झाला होता. सोलापुरात नॉर्थकोट प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. सोलापुरात २००६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वनखात्यात ३६ वर्षे प्रदीर्घ काळ त्यांनी वनाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी निसर्ग – वन्यजीवांचा सखोल अभ्यास केला होता. निसर्गविषयक विपुल लेखन त्यांनी केले. निवृत्तीनंतरही ते अनेक वर्षे जंगलात राहत होते. त्यांच्या रातवा या पुस्तकाला १९९३-९४ साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अन्य अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. (Maruti Chittampalli)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.