पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या १२१ व्या भागाची सुरुवात पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे स्मरण करून केली. ते म्हणाले, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे. संपूर्ण जगाने शोक व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्यामुळे देशातील जनता संतप्त आहे. पीडितांना नक्कीच न्याय मिळेल. असा पुनरूच्चार पंतप्रधान मोदींनी केला आहे. (Mann Ki Baat)
कट रचणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काश्मीरमध्ये शांतता परत येत आहे, शाळा आणि महाविद्यालये चांगली सुरू आहेत, बांधकामांना अभूतपूर्व गती मिळाली आहे, लोकशाही मजबूत होत आहे, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे, लोकांचे उत्पन्न वाढत आहे, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही. या हल्ल्यातील दोषी आणि कट रचणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल.” (Mann Ki Baat)
जागतिक नेत्यांचा मला फोन आला…
मन की बातच्या १२१ व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जागतिक नेत्यांनी मला फोन केले, पत्रे लिहिली, संदेश पाठवले. सर्वांनी या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १.४ अब्ज भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल. या हल्ल्यातील कट रचणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल.” (Mann Ki Baat)
जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
यावेळी पंतप्रधान भारत जागतिक अंतराळ शक्ती बनण्याबद्दलही बोलले. म्हणाले, एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करून आम्ही विक्रम रचला आहे. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनलो आहोत. आज आपण जगभर भारताच्या प्रतिभेचे कौतुक होताना पाहतो. भारतातील तरुणांनी जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि कोणत्याही देशातील तरुणांची आवड देशाचे भविष्य कसे असेल हे ठरवते. आज भारतातील तरुणाई विज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत आहे. पूर्वी मागासलेपणा आणि इतर कारणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या भागातही, तरुणांनी अशी उदाहरणे मांडली आहेत जी आपल्याला नवीन आत्मविश्वास देतात. (Mann Ki Baat)
#Myholiday
आता भारताने आपले अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी देखील खुले केले आहे. आज अनेक तरुण अंतराळातील स्टार्टअप्समध्ये नवीन झेंडे फडकावत आहेत. १० वर्षांपूर्वी या क्षेत्रात फक्त एकच कंपनी होती, पण आज देशात तीनशे पंचवीसहून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. मन की बातच्या शेवटच्या भागात, पंतप्रधान मोदींनी परीक्षा देऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना नवीन कामे दिली होती. त्यांनी सांगितले होते की, या उन्हाळ्यात त्यांना काहीतरी नवीन शिकायचे आहे आणि ते #Myholiday सह सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहे. (Mann Ki Baat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community