Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण…

Mangaldas Bandal : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती.

136
Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण...
Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण...

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची इंदापूर दौऱ्यात भेट घेणार  मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने (vanchit bahujan aghadi)  रद्द केली आहे. पक्षाच्या वतीने शनिवारी या निर्णयाची माहिती देण्यात आली. (Mangaldas Bandal)

(हेही वाचा- India Forex Reserves : भारताचा परकीय चलन साठा थेट ६४५.६ अब्ज अमेरिकन डॉलरवर)

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचितने (vanchit bahujan aghadi) बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Chandra Pawar party) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. (Mangaldas Bandal)

(हेही वाचा- Shahrukh Khan Offers Gambhir Blank Cheque : शाहरुख खानने गौतम गंभीरला खरंच कोरा चेक देऊ केला?)

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) गेल्याने त्यांची उमेदवारी  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते फारुक अहमद यांनी आज दिली. (Mangaldas Bandal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.