‘Make in India’च्या ताकदीसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; संपूर्ण जग म्हणतेय आम्हाला शस्त्रास्त्र द्या; नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन

'Make in India'च्या ताकदीसह भारताने एअरबेस उद्ध्वस्त करताच पाकिस्तानने गुडघे टेकले अन् युध्दविराम झाला, असे विधान नागपूर येथील आयोजित तिंरगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.

37

‘Make in India’च्या ताकदीसह भारताने एअरबेस उद्ध्वस्त करताच पाकिस्तानने गुडघे टेकले अन् युध्दविराम झाला, असे विधान नागपूर येथील आयोजित तिंरगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. संपूर्ण भारत सैन्यदलाच्या पाठीशी उभा असून शहर ते ग्रामीण प्रत्येक व्यक्ती देशाच्या पाठीशी उभा आहे. भारतीय सैन्याच्या प्रती देशभरात पाहायला मिळत आहे, हेच तिरंगा रॅलीत आपल्याला पाहायला मिळत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा तुर्कीला आणखी एक धक्का! Mumbai IIT ने तुर्की विद्यापिठांसोबतचे सर्व शैक्षणिक करार केले स्थगित )

मुख्यमंत्री म्हणाले, भारताची लष्करी ताकद जगातील पहिल्या पाचपैकी एक आहे. आपरेशन सिंदूरमध्ये भारताचं युध्द प्राबल्य पाहायला मिळालं याच श्रेय आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया(Make in India) अशाप्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया(Make in India) असे म्हणायचे, त्यावेळी लोकांनी जुमला असं म्हटल्याचे सांगतानाच आता आपण तोच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाची ताकद बघितली. त्याचबरोबर, भारताची ताकद पाहून अख्खं जग म्हणतंय ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या, हे भारताने करून दाखविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा California blast : कॅलिफोर्नियात क्लिनिकबाहेर दहशतवादी हल्ला ; एकाचा मृत्यू , FBI ची माहिती )

ब्रम्होससारख्या हवाई संरक्षण प्रणालीला जगभरातून मागणी येत असताना मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या संरक्षण दलाच्या(Make in India) लष्करी क्षमतेची मागणी सगळेच करत असून सबंध जगाच्या लक्षात आलं की, जर आपल्याला सुरक्षित राहायचे असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्रे भारताकडे आहेत. त्याचबरोबर, तुर्कीसारखा देश दहशतवादासारख्या मानवतेविरुध्दच्या अपराधाला पाठबळ देतोय त्या तुर्की राष्ट्रावर भारतीयांनी बहिष्कार टाकला आहे. तुर्कीलाही लक्षात आले आहे की, भारताची ताकद काय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.(Make in India)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.