अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनेने (परस्पर आयात शुल्क) जगभरात खळबळ उडवली आहे. छोट्या-मोठ्या अमेरिकेच्या सर्वच व्यवसाय भागीदारांवर परस्पर शुल्काचा हल्ला चढवला. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षानुवर्षे ज्या मेड इन इंडिया उपक्रमाबद्दल बोलत आहेत, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. (Tim Cook)
हेही वाचा-Weather Update : उत्तरेकडील राज्यांना अवकाळीचा फटका ! वादळामुळे १० जणांचा मृत्यू
आता ॲपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली आहे. एका मुलाखतीत टिम कुक यांनी म्हटले आहे की मार्च तिमाही, म्हणजे जानेवारी ते मार्च, या काळात अमेरिकेत विकल्या गेलेल्या अर्ध्याहून अधिक आयफोन भारतातून आले आहेत. एवढेच नाही तर कंपनी जूनमध्ये संपणाऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल, मे आणि जूनमध्ये अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतातून आयात करेल. (Tim Cook)
हेही वाचा- नागरिकांचा सहभाग वाढवून सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी BMC करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर
कंपनी पुरवठा साखळीत सतत बदल करत आहे. अमेरिकेत विकले जाणारे अॅपलचे आयफोन आता भारतात बनवले जातील. तर आयपॅड, अॅपल घड्याळे, मॅक आणि एअरपॉड्स व्हिएतनाममधून येतील, असे आमचे सहयोगी इकॉनॉमिक टाइम्स (ईटी) ने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यात चीनचा अजिबात उल्लेख नाही. (Tim Cook)
हेही वाचा- भारताची निर्यात पोहोचली विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर; Reserve Bank of India चा अहवाल
अमेरिकेने लादलेल्या करांमुळे चीनमध्ये उत्पादित होणारी अॅपलची उत्पादने महाग होत आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली, जी आता समोर आली आहे. त्याचवेळी, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन आता भारतात तयार करण्याची आशा व्यक्त केली. तसेच चीनमध्ये बनवलेले उत्पादन अमेरिकेऐवजी इतर देशांमध्ये पाठवले जातील. (Tim Cook)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community