Maharashtra Sign MoU :  राज्यात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक, सरकारकडून रोजगारनिर्मितीस चालना

Maharashtra Sign MoU :   महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (Maharashtra Sign MoU) केला.

38

प्रतिनिधी

Maharashtra Sign MoU :   महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (Maharashtra Sign MoU) केला. या करारामुळे राज्यात ५,१२७ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक येणार असून, थेट आणि अप्रत्यक्ष मिळून २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

या कराराच्या माध्यमातून नागपूर, चाकण, भिवंडी यासारख्या ठिकाणी आधुनिक लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स उभारले जाणार असून हे प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला गती देतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कराराअंतर्गत १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन वापरली जाईल, त्यापैकी १.८५ कोटी चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम होईल. या प्रकल्पांमुळे ५,१२७ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक येणार आहे, ज्यामुळे २७,५१० रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा Make in India : शत्रूंच्या ड्रोन स्वार्मला भारताचं ‘भार्गवस्त्र’ पुरून उरणार, काउंटर-ड्रोन सिस्टिमची यशस्वी चाचणी )

हा करार महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब बनवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी उभारली जाणारी ही पार्क्स पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असतील. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळीच्या उत्कृष्टतेसाठी ही मजबूत पायाभूत सुविधा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करार उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्यात स्वाक्षरीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन ॲडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन आणि एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल उपस्थित होते.Maharashtra Sign MoU

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.