Maharashtra : विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची – राज्यपाल रमेश बैस

115
Maharashtra : विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची - राज्यपाल रमेश बैस

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राची (Maharashtra) भूमिका महत्वाची होती. या राज्याने स्वातंत्र्यलढ्याला नेतृत्व दिले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी देखील महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी राजभवनातील (Maharashtra) दरबार हॉल येथे ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ आणि ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचे अनावरण करण्यात आपले. या कार्यक्रमावेळी राज्यपाल रमेश बैस बोलत होते.

यावेळी (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सैनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गॅझेटर विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील महाराष्ट्रातील समाज सुधारक, विचार वर्धक आणि हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्य संग्राम मे महाराष्ट्र का योगदान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कलावंतांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला.

(हेही वाचा – World Photography Day : भारतातील २०२३ मधील ५ मंत्रमुग्ध करणारी छायाचित्रे)

राज्यपाल बैस म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबविण्यात आले. तसेच यंदाचे वर्ष छ्त्रपती शिवाजी महाराज (Maharashtra) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

२०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याची प्रतिज्ञा आपण घेतली आहे. विकसित भारतासाठी महाराष्ट्राची (Maharashtra) भूमिका महत्वाची राहणार आहे. देशातील गरिबी, भूकबळी संपविण्यासाठी तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण केले पाहिजे. कौशल्याला वाव दिला पाहिजे. त्यासाठी राज्यात कौशल्य विद्यापीठाचे बळकटीकरण केले पाहिजे. त्यातून महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी होईल. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. विकसित भारतासाठी प्रत्येक विभागाने आपले उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याचे अमृत मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी माझी माती, माझा देश हे उपक्रम राबविण्यात आले.

महाराष्ट्रातूनच (Maharashtra) स्वातंत्र्याचा हुंकार उठला. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गावरून राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची आहे. त्यातूनच छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होईल. शहाजीराजे यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरणाचा क्षण राज्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू असून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. हा देशवासीयांचा सन्मान आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.