नगर पंचायत निवडणूक : महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचा ‘विकास’ सेना-काँग्रेसचे नुकसान

113

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवल्यावर प्रथमच राज्यातील नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळीच्या निवडणुका २०१९मध्ये राज्यात निर्माण केलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात आल्या. या बदलत्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीचाच विकास झालेला दिसत आहे. कारण महाआघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेची या निवडणुकीत बरीच पीछेहाट झाल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रवादी तीनवरून पहिल्या क्रमांकावर  

२०१६-१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर होता, त्या खालोखाल काँग्रेस पक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर शिवसेना होता. मात्र तीन पक्षांच्या महाविकास आघाडीनंतर जेव्हा नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादीने तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सेना चौथ्या क्रमांकावर आहे. या वेळी भाजप एकटा लढत होता.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा!)

भाजपचा क्रमांक एकचा पक्ष! 

मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्य संख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!, असे ट्वीट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

सेनेचा मुख्यमंत्री पदाच्या ऊबदार खुर्चीने घात! 

आजच्या निवडणुकांचे निकाल पाहून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, भारतीय जनता पार्टी हा राज्यातील सर्वोच्च पक्ष आहे. मी आताही म्हणतो की महाराष्ट्रात एकट्याने लढून दाखवा, मग कोणाची ताकद जास्त आहे ते तुम्हाला कळेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाच्या ऊबदार खुर्चीने घात केला आहे. राजाला ऊबदार खुर्ची मिळाली आहे, बाकी पक्ष, कार्यकर्ते यांचे काही झाले तरी पर्वा नाही, अशी सेनेची अवस्था झाली आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

नगर पंचायतीत कुणाला किती यश? 

  • राष्ट्रवादी काँग्रेस – २६
  • भाजप  – २५
  • काँग्रेस – २१
  • शिवसेना – १७
  • इतर – ८

(हेही वाचा 32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांसाठी ठरली ‘ती’ काळरात्र! नेटक-यांनी अशा जागवल्या आठवणी…)

जिल्हा परिषद भंडारा 

  • काँग्रेस – १८
  • राष्ट्रवादी – १३
  • भाजप – १२
  • शिवसेना – ०
  • अन्य – ५

गोंदिया

  • भाजप – २५
  • काँग्रेस – १८
  • राष्ट्रवादी – ८
  • शिवसेना – ०
  • अन्य – ५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.