Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे ? अधिवेशनात चर्चा, कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

133
Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे ? अधिवेशनात चर्चा, कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

नवी मुंबईत विमानाच्या धडकेमुळे अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल विधानसभेत शुक्रवारी, (५ जुलै) घेण्यात आली. विधानसभेच्या सभागृहात (Maharashtra Monsoon Session) या पक्ष्यांबाबत चर्चा करून मूक पक्ष्यांबद्दल संवेदनशीलता दाखवण्यात आली. गेल्या काही दिवसांत फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या मुद्द्यावर चर्चा करत असताना या फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे होतोय याबाबत सभागृहात विचारविनिमय झाला.

(हेही वाचा – Jotiba Temple मूर्ती संवर्धन प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार, ११ जुलैपर्यंत दर्शन बंद)

मृत्यूला नक्की कारण काय ?
आमदार चेतन तुपे आणि आशिष शेलार यांनी त्यावरून प्रश्न निर्माण केला. ६ फ्लेमिंगोपैकी ४ फ्लेंमिगोच्या मृत्यूचा अहवाल आला; पण इतर दोन फ्लेंमिगोंच्या मृत्यूचा अहवाल अजून आलेला नाही. त्याशिवाय फ्लेमिंगो मध्य आशियामधून येत असतील, तर मग त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण काय ? असा प्रश्न विचारण्यात आला.

सरकारनं नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती
त्यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी मृत्यूचं कारण प्रदूषित पाणी नसल्याचे म्हणत कार्डियक फेल्युअरमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तसंच फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू बोर्ड आणि लाइट्सला धडकून होत असल्याचा अंदाज व्यक्त केला. या प्रकरणात आता उच्चस्तरीय चौकशी समिती सरकारनं नेमली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचं मिश्किल उत्तर
विशेष म्हणजे या वैज्ञानिक कारणाबरोबरच ८६ लक्ष योनीच्या संदर्भातलं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किलरित्या केलं. त्याला सभागृहातले किती आमदार ८६ लक्ष योनीमधून फ्लेमिंगो रूपात येतील अशा पद्धतीची विचारणा आशिष शेलार यांनी केली. त्यावर ही माहिती गुप्त असल्याचे सांगत कोणीही फ्लेमिंगोच्या रूपात येऊ शकतो त्यामुळे ती पटलावर ठेवता येणार नाही, असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. त्यानंतर फ्लेमिंगोच्या चर्चेने प्रश्नाचा शेवट झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.