Maharashtra Legislative Session: ठाकरे गटातील नेत्याचा बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर व्हिडियो व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नितेश राणे यांनी बडगुजर यांचे १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीबरोबरचे फोटो दाखवून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले.

182
Maharashtra Legislative Session: ठाकरे गटातील नेत्याचा बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर व्हिडियो व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Maharashtra Legislative Session: ठाकरे गटातील नेत्याचा बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर व्हिडियो व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात (Maharashtra Legislative Session) शुक्रवारी, ११ डिसेंबरला भाजप नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे काही फोटो दाखवत त्यांच्यावर आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली.

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलिम बडगुजरसोबत नाचतानाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सलिम कुत्ता हा दाऊदचा हस्तक असून तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली.

(हेही वाचा – Drug Case : १६ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात)

या पार्टीचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली. यावर चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असतानाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला. याविषयी ते म्हणाले की, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी ९३च्या बॉम्बस्फोटात जन्मठेप भोगतोय. १९९३चा बॉम्बस्फोट देशाला हादरवणारा होता. हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठिंबा आहे. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षांसोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असतानाचा फोटो आणि व्हिडियो आहेत.

मविआचं सरकार आल्याने पेग, पेंग्विन आणि पार्टीला सुरुवात झाली, असे आशिष शेलार म्हणाले तसेच ते पुढे असही म्हणाले की,  कुत्त्याला बिल्लीचं समर्थन आहे. राजकीय वरदहस्त असल्याची ही बाब आहे.

(हेही वाचा – Volleyball Team Attacked in Turkey : टर्कीमध्ये फुटबॉलनंतर आता व्हॉलीबॉल सामन्यात धक्काबुक्की )

राणे यांनी बडगुजर यांचे १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीबरोबरचे फोटो दाखवून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. नितेश राणे यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनीही ही बाब गंभीर असल्याचं सांगून बडगुजर यांच्या चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं आहे.

या प्रकरणाबाबत दादा भुसे म्हणाले की, बडगुजर हा छोटा मासा आहे. देशाचा नंबर एकचा शत्रू दाऊद आहे. त्याला रसद पुरवणारा कोण आहे? बडगुजरचा तपास केला पाहिजे. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.