
-
प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादात महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन कार्यक्रमाने नव्याने पेट घेतला आहे.
राज्य शासनाच्या अधिकृत परिपत्रकानुसार रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदन सोहळा आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या घोषणेनंतर गोगावले यांना पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून मागे टाकल्याची चर्चा रंगली असून, यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ध्वजवंदनाचा अधिकार म्हणजे पालकमंत्रिपद नव्हे. मी रायगडचा मावळा आहे; तलवार म्यान केलेली नाही.” (Maharashtra Day)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर शेजाऱ्यांची साथ कुणाला ?)
राजकीय कुरघोडी की प्रशासनिक निर्णय?
रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असल्याचे भरत गोगावले यांनी अनेक वेळा जाहीर केले होते. मात्र अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा न झाल्याने त्यांच्या भूमिकेला सुरुंग लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, आदिती तटकरे यांना झेंडावंदनाची जबाबदारी देऊन सरकारने एकप्रकारे त्यांच्याच पारड्यात वजन टाकल्याचे संकेत दिले आहेत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शिंदे सरकारचं डावपेचीय राजकारण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून अनेक नेते नाराज आहेत. यामध्ये भरत गोगावले यांचा समावेश असून, त्यांच्या सारख्या स्थानिक प्रभावशाली नेत्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो आहे. (Maharashtra Day)
(हेही वाचा – ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांना धक्का: जळगावात दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार Ajit Pawar गटात)
राज्यात इतर जिल्ह्यांतील झेंडावंदनासाठी नेत्यांची यादी
महाराष्ट्र दिनी राज्यभरात होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी मंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली असून, ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यात अजित पवार, नागपूरमध्ये बावनकुळे, मुंबईत मंगलप्रभात लोढा, नाशिकमध्ये गिरीश महाजन अशा प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडसाठी आदिती तटकरे यांचं नाव आल्यानेच हा वाद उफाळला.
राजकीय वर्तुळातील खळबळ
राजकीय निरीक्षकांच्या मते, ध्वजवंदन ही एक प्रतीकात्मक परंतु महत्त्वाची जबाबदारी असते आणि कोणत्याही मंत्र्याला ही जबाबदारी देणे, हा त्या जिल्ह्याच्या नेतृत्वासाठीचा संकेत मानला जातो. त्यामुळे गोगावले यांची नाराजी समजण्यासारखी असून, हे केवळ प्रशासकीय नियोजन नव्हे तर राजकीय डावपेचही असू शकतो.
राजकीय संघर्षाचा शेवट कधी?
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा केव्हा सुटेल, हे स्पष्ट नाही. पण महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाच्या निमित्ताने उभा राहिलेला हा वाद राजकीय रणधुमाळी आणखी तीव्र करेल, हे निश्चित. (Maharashtra Day)
(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : धोनी, विराटकडून वैभवला काय मंत्र मिळाला?)
महाराष्ट्र दिन झेंडावंदन संपूर्ण यादी
एकनाथ शिंदे- ठाणे
अजित पवार- पुणे
चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर
राधाकृष्ण विखे-पाटील- अहिल्यानगर
चंद्रकांत पाटील- सांगली
गिरीश महाजन- नाशिक
गणेश नाईक- पालघर
गुलाबराव पाटील- जळगाव
दादा भुसे- अमरावती
संजय राठोड- यवतमाळ
मंगलप्रभात लोढा – मुंबई शहर
उदय सामंत – रत्नागिरी
जयकुमार रावल – धुळे
पंकजा मुंडे – जालना
अतुल सावे – नांदेड
अशोक वुईके – चंद्रपूर
शंभूराज देसाई- सातारा
अॅड. आशिष शेलार – मुंबई उपनगर
दत्तात्रय भरणे- वाशिम
आदिती तटकरे- रायगड
शिवेंद्रसिंह भोसले – लातूर
अॅड. माणिकराव कोकाटे – नंदूरबार
जयकुमार गोरे – सोलापूर
नरहरी झिरवाळ – हिंगोली
संजय सावकारे – भंडारा
संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर
प्रताप सरनाईक- धाराशिव
मकरंद जाधव (पाटील)- बुलढाणा
नितेश राणे – सिंधुदुर्ग
आकाश फुंडकर – अकोला
बाबसाहेब पाटील – गोंदिया
प्रकाश आबिटकर- कोल्हापूर
आशिष जयस्वाल- गडचिरोली
पंकज भोयर- वर्धा
मेघना बोर्डीकर- परभणी
इंद्रनील नाईक- बीड
हेही पहा –
Join Our WhatsApp Community