Rahul Narvekar: ‘संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का?’, राहुल नार्वेकर यांचा पलटवार

92
Rahul Narvekar: 'संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का?', राहुल नार्वेकर यांचा पलटवार
Rahul Narvekar: 'संजय राऊत म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे का?', राहुल नार्वेकर यांचा पलटवार

शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मागील सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)  यांनी विधानसभा अध्यक्षांवर घणाघाती टीका केली होती. याला आता राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर पलटवार केले आहेत.

हे सरकार संविधानविरोधी, बेकायदेशीर आहे. चोर, लफंग्यांचे सरकार चालवतायेत. त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल, तर या देशात आणि राज्यात काय चालंलय याची कल्पना न केलेली बरी. शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार हे मूळ घरातील चोरी, लूट करून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनंतर राहुल नार्वेकर हे नाव उद्या जेव्हा खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल. या राज्यातील जनता माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यांना फासावर लटकवायचे आदेश दिल्लीतून आले आहेत. या शब्दांत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा – Jammu Kashmir : कलम ३७० हटवल्याचा असाही परिणाम; परदेशी पर्यटकांच्या संख्येत झाली ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ )

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहेत का?
संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी करण्याची जुनी सवय आहे, असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावे? त्यांना का महत्त्व द्यावे? संजय राऊत म्हणजे काय सुप्रीम कोर्ट आहेत का? प्रेसिंडेंट ऑफ इंडिया आहेत का ? त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावे? संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. संजय राऊतांसारख्या व्यक्तीच्या प्रश्न किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वत:ची गरिमा करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.