महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट : CM Devendra Fadnavis

92
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट : CM Devendra Fadnavis
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट : CM Devendra Fadnavis

नीती आयोगाच्या पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) भाषण केले. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑपरेशन सिंदूर बद्दल हृदयपूर्वक आभार मानले. तसेच मोदीजींच्या दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प यातून अधोरेखित होतो, असे ते यावेळी म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था !

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकार सुद्धा महाराष्ट्र 2047 असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालिन, महाराष्ट्र आपला ‘अमृत महोत्सव’ साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035 साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे.” (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक

“विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची करणे, हा आमचा मुख्य उद्देश. नवीन उद्योग धोरणाचा उद्देश जीएसडीपीत उत्पादन क्षेत्राचे योगदान 20 टक्क्यांच्या वर आणणे हा आहे. मैत्री 2.0 ही सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, ईव्ही, सेमिकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर्स यासारख्या नवक्षेत्रांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.” (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Corona Update : ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

“2024-25 या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील 50 टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरु झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे.” असं फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Indus Water Treaty :   “….तोपर्यंत हा करार स्थगित राहील”; भारताने संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तानला दाखविला आरसा

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधान महोदयांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र संपूर्ण क्षमतेने विकसित भारत-2047 चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी तत्पर असेल.” असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.