Mahadev Betting App : महादेव ॲपमधील पैसा गोरेगाव, मीरा रोडमधील बांधकाम व्यवसायात वापरला; अॅड. आशिष शेलार यांचा आरोप

145
महादेव ॲप (Mahadev Betting App) प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमधील आरोपी क्र.२ अमित शर्मा हा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ मुस्ताकीन याचा भागीदार असून या दोघांवर महादेव ॲप चालवण्याचा आरोप आहे. तसेच विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपनीत या दोघांनी पैसे गुंतविलेले आहेत. या कंपनीचे मुंबईत गोरेगाव आणि मीरा रोड येथे सरु असून अंडरवर्ल्डचा पैसा बांधकाम व्यवसायात वापर गेल्याची माहिती समोर आली आहे, असा आरोप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.

गुन्हेगाराचा दाऊदशी संबंध

भाजपा आमदार आणि विधानसभा प्रतोद अॅड. आशिष शेलार यांनी एक मोठ्या गैरव्यवहार उघड करीत विधानसभेत नियम 105 नुसार लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर बोलताना  अॅड. आशिष शेलार म्हणाले की, अमित शर्मा आणि विजय जैन यांचा मुंबईत गोरेगाव येथे सुरु असलेल्या जे पी डेक हा बांधकाम प्रकल्पाला ररेश शहा यांच्या एडलवाईस (EDELWEISS) या वादग्रस्त फायनान्स कंपनीने 1 हजार कोटी रुपयांचा फायनान्स केला आहे, असाही गंभीर आरोप आमदार आशिष शेलार यांनी या लक्षवेधीवर चर्चा करताना केला. अशा प्रकारे देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणे यावर अमित शर्मा आणि ररेश शहा एडलवाईस या कंपनीची त्वरीत चौकशी करुन यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महादेव ॲप (Mahadev Betting App) ची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली असून संपूर्ण देशभरातील विविध राज्यात या गुन्ह्याची व्याप्ती असून या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तर आमदार अॅड. आशिष शेलार यांनी जी माहिती दिली. त्या प्रकरणातील विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा या बांधकाम व्यावसायिक कंपनी, अमित शर्मा, एडलवाईस आणि रशेश शहा यांच्यामध्ये झालेल्या संपूर्ण व्यवहारात करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे? हा पैसा कायदेशीर मार्गाने बँकेच्या माध्यमातून आला की काळा पैसा यामध्ये टाकण्यात आला? यामध्ये काही गैरव्यवहार आहे का? यामध्ये गुन्हेगारी संबंध आहेत का? या सगळ्याबाबत येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, जर गैरव्यवहार आढळला तर कारवाई करण्यात येईल. महादेव ॲप (Mahadev Betting App) आणि देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या रशेश शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनी आणि त्यामध्ये झालेल्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.