कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofia) यांच्याबाबत मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि विजय शाह यांच्याविरुद्ध ४ तासांच्या आत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना आदेश दिले आणि विजय शाह यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने या प्रकरणात राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनाही कडक सूचना दिल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत एफआयआर नोंदवलाच पाहिजे असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी सकाळी होईल. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य प्रशासन आणि पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी एका बैठकीत कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofia) यांचे नाव न घेता पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्दल म्हटले होते की, ‘आम्ही त्यांची बहिणी पाठवून त्यांची ऐशी तैशी केली. आता या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विजय शाह यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली. दरम्यान विजय शाह यांनी माफी मागितली आणि म्हटले की, ‘मी माझ्या स्वप्नातही कर्नल सोफिया (Colonel Sofia) बहिणीबद्दल चुकीचा विचार करू शकत नाही. तसेच मी सैन्याचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. बहीण सोफिया (Colonel Sofia) यांनी जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशाची सेवा केली आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मी त्यांना सलाम करतो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही सैन्याशी संबंधित आहे. ज्या बहिणींचे सिंदूर दहशतवाद्यांनी नष्ट केले होते त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मी हे विधान केले होते. जर उत्साहात माझ्या तोंडून काही चुकीचे निघाले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.
Join Our WhatsApp Community