LPG Shortage Crisis : युद्धजन्य स्थितीतही महाराष्ट्राची ‘ऊर्जा’ कायम! गॅस आणि इंधनाचा साठा फुल्ल; अफवांच्या ‘वावटळी’त अडकू नका!

LPG Shortage Crisis : युद्धजन्य स्थितीतही महाराष्ट्राची 'ऊर्जा' कायम! गॅस आणि इंधनाचा साठा फुल्ल; अफवांच्या 'वावटळी'त अडकू नका!

85
LPG Shortage Crisis : युद्धजन्य स्थितीतही महाराष्ट्राची 'ऊर्जा' कायम! गॅस आणि इंधनाचा साठा फुल्ल; अफवांच्या 'वावटळी'त अडकू नका!
LPG Shortage Crisis : युद्धजन्य स्थितीतही महाराष्ट्राची 'ऊर्जा' कायम! गॅस आणि इंधनाचा साठा फुल्ल; अफवांच्या 'वावटळी'त अडकू नका!
​मुंबई, प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे प्रशासनाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही.(LPG Shortage Crisis)

​शासनाने गॅस वाटपासाठी एक विशेष ‘प्राधान्य क्रम’ निश्चित केला असून, त्यात सामान्य जनतेशी संबंधित अत्यावश्यक सेवांना सर्वोच्च स्थान दिले आहे. रुग्णालये, शाळांमधील माध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा आणि महाविद्यालयांच्या मेसमध्ये गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. उपलब्ध उत्पादनातून राज्याची ही गरज सहज पूर्ण होऊ शकते, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.(LPG Shortage Crisis)

(हेही वाचा – PRAHAAR Terror Policy : आता शत्रूंची खैर नाही; कशी आहे दहशतवादाविरोधातील भारताची रणनीती? )

​इंधनाच्या आघाडीवरही राज्याची स्थिती भक्कम आहे. सध्या बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यातील रिफायनरी (तेल शुद्धीकरण कारखाने) पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. राज्यात दररोज सुमारे १५,००० किलो लिटर पेट्रोल आणि ३८,००० किलो लिटर डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. घराघरात पोहोचणाऱ्या पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) बाबतही कोणतीही अडचण नसल्याने गृहिणींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.(LPG Shortage Crisis)

​युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होईल, या भीतीने काही ठिकाणी साठेबाजीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. मात्र, रिफायनरीमधून होणारा दररोजचा प्रचंड पुरवठा पाहता इंधनाची कमतरता भासणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. “तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इंधनाचा साठा पुरेसा आहे, त्यामुळे विनाकारण साठा करू नका,” असे आवाहन सरकारने राज्यातील जनतेला केले आहे.(LPG Shortage Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.