तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची नवीन किरकोळ किंमत आजपासून १७२३.५० रुपये इतकी झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG)
हेही वाचा-Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक !
भारतात एलपीजीचा सुमारे ९० टक्के वापर स्वयंपाकासाठी घरगुती वापरात होतो, तर उर्वरित १० टक्के वापर व्यावसायिक, औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात होतो. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरवरील ही कपात ही लहान उद्योगधंद्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. (LPG)
हेही वाचा- Chenab River : जलयुद्धात भारताची सरशी ; चिनाब नदीच्या पाण्यावरून पाकचा ठणठणाट सुरू !
ही कपात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच इतर लघु व्यवसायांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही सिलिंडरच्या किमती १,७६२ रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या होत्या, तर फेब्रुवारीमध्ये ७ रुपयांची कपात झाली होती. मात्र मार्चमध्ये या किंमतीत पुन्हा ६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. (LPG)
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा पुरेसा असल्यामुळे त्याच्या किमती प्रति बॅरल ६५ डॉलरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ही किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी असून, भारतासारख्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तेल आयातदार देशासाठी मोठा दिलासा ठरू शकतो. (LPG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community