कानपूर येथील एका महिलेने पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. सोनू उर्फ सरताज नावाच्या एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने तिचे शारीरिक शोषण केले आणि आता तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि तिच्या हातातील ‘ओम’ टॅटू काढून टाकण्यासाठी दबाव आणत आहे. मुलीने विरोध केल्यावर सरताजने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. (Love Jihad)
कानपूरमधील एका हिंदू मुलीने पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार केली आहे की, ती लव्ह जिहादची (Love Jihad) बळी ठरली आहे. २५ वर्षीय हिंदू तरुणीच्या म्हणण्यानुसार, एक वर्षापूर्वी सोनू नावाच्या एका तरुणाने तिच्याशी फोनवर संपर्क साधला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तो तरुण मुसलमान असल्याचे समोर आले. ती तरुणी एका खाजगी कंपनीत काम करते. तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलीने लग्नासाठी त्याच्यावर दबाव आणला तेव्हा तरुणाने त्याचे खरे नाव सरताज सांगितले. तो म्हणाला की, तो मुस्लिम आहे आणि जेव्हा मुलगी तिच्या हातावरील ओमचा टॅटू काढून इस्लाम धर्म स्वीकारेल तेव्हाच लग्न करेन, असे सरताज म्हणाला. (Love Jihad)
जेव्हा मुलीने असे करण्यास नकार दिला तेव्हा तरुणाने तिला धमकी दिली की, त्याच्याकडे एक अश्लील व्हिडिओ आहे. त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि म्हटले की एकतर तिने मुस्लिम म्हणून लग्न करावे अन्यथा आत्महत्या करावी. या घटनेची माहिती बजरंग दलाचे माजी नेते कृष्णा तिवारी यांना देण्यात आली. त्यांच्यासोबतच मुलगी पोलिस आयुक्तांकडे पोहोचली. कार्यालयात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवाबगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपी सोनू उर्फ सरताजचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एडीसीपी योगेश कुमार म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे. आरोपी बाबूपुरवा येथील रहिवासी आहे. (Love Jihad)