Loksabha Election : ‘या’ 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे

135
Loksabha Election : 'या' 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
Loksabha Election : 'या' 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सुचना केल्याची सूत्रांची माहिती आहे.महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Loksabha Election)

सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. (Loksabha Election)

(हेही वाचा : Jalna OBC Sabha : जालन्यात ‘जमाव बंदी’चे आदेश)

संभाव्य उमेदवारांची नावे
बारामती – सुनेत्रा पवार
सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
रायगड – सुनिल तटकरे
शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
परभणी- राजेश विटेकर
भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
धाराशिव – राणा जगजितसिंह
छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण

दरम्यान लोकसभेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे अजित पवार गटही आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीवेळी लोकसभेच्या जागेची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.