Ajit Pawar: वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझा असता, अजित पवारांची शरद पवार गटावर टीका

234
Shiv Jayanti 2024 : जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार
Shiv Jayanti 2024 : जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला असता, असं उपमुख्यमंत्री अजित पवार गहिवरून म्हणाले. तसेच वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली. जो व्हीप द्यायचा आहे तो आमच्या बरोबर आहे. उगीच आमची बदनामी का करता, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटावर टीका केली.

अजित पवार शुक्रवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. बारामतीतील पाटस रोडवरील वृंदावन गार्डन या मंगल कार्यालयात बारामतीतील तालुका आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि बुथ कमिटी मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार बोलत होते.

(हेही वाचा – Dargah Encroachment Bhayandar : 57 हेक्टर सरकारी जागेवर दर्ग्याचे अतिक्रमण; अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्या हस्तक्षेपानंतर तहसीलदारांचा मोठा निर्णय )

अजित पवार म्हणाले, जर मी वरिष्ठांच्या म्हणजे शरद पवारांच्या पोटी जन्माला आला असतो, तर पक्ष माझा झाला असता. खरंतर मी सख्ख्या भावाचाच मुलगा होतो ना? मग मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, हे आमचे दुर्दैव. आम्हाला सांगितलं गेलं की, त्यांच्या मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे, आम्ही मान्य केले. ते म्हणाले, आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठांसह (म्हणजे शरद पवार आणि दुसरे वरिष्ठ म्हणजे प्रतापराव पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत) मी आणि माझा फक्त परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे, असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले.

अजित पवार असे म्हणताच कार्यकर्ते उठले. कार्यकर्तेदेखील गहिवरले आणि त्यांनी आत्ताच उमेदवाराचे नाव जाहीर करा, आम्ही त्यांना निवडून आणल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही काळ अजित पवारांना शब्द सुचले नाहीत. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही यावेळी टीका केली. ते म्हणाले, ‘मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही, पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे’.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पंधरा वर्षांत आम्हाला फोन नाही, आता आम्हाला फोन येतो. विचारपूस केली जाते. पाणी कसं आहे, कसलं पाणी शेतीच पाणी की पिकाचं पाणी नक्की कसलं पाणी. काय काय आम्ही तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही विसरून जाताय हे बरोबर नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी महायुती केली आहे. बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आम्ही पक्ष बदलतोय तर आमच्या बदनामी करतायत. काही जण नुसते बोलतात, माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पण तुम्ही कामं तर केली पाहिजे, भ्रष्टाचार होणार कसा, काम करतो त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.