Loksabha Election 2024 : निर्णायक राज्य असलेल्या Uttar Pradesh मध्ये कोणत्या पक्षाचे पारडे जड ?

५४३ पैकी ८० खासदार एकट्या उत्तर प्रदेशमधून येतात. त्यामुळे Loksabha Election च्या राजकारणात उत्तर प्रदेशला मोठे महत्त्व असते. आकडेवारीमध्ये मात्र भाजप ३७, समाजवादी पार्टी ३३, तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे.

165
Loksabha Election 2024 : निर्णायक राज्य असलेल्या Uttar Pradesh मध्ये कोणत्या पक्षाचे पारडे जड ?
Loksabha Election 2024 : निर्णायक राज्य असलेल्या Uttar Pradesh मध्ये कोणत्या पक्षाचे पारडे जड ?

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक राज्यांमधून धक्कादायक निकाल समोर येऊ लागले आहेत. भाजपने ४०० पारचा नारा दिला असला, तरी इंडि आघाडीनेही या वेळी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेश हे त्यापैकी एक राज्य आहे. ५४३ पैकी ८० खासदार एकट्या उत्तर प्रदेशमधून येतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या राजकारणात उत्तर प्रदेशला मोठे महत्त्व असते. देशातील सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ (८०) असलेल्या या राज्यात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विजयाची हॅट्रीक होणार?)

फैजाबादमध्ये समाजवादी पार्टीला आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) यंदादेखील भाजपाचं वर्चस्व असेल असा दावा अनेक एक्झिट पोल्समध्ये करण्यात आला होता. मात्र आकडेवारीमध्ये मात्र भाजप ३७, समाजवादी पार्टी ३३, तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. यंदा अयोध्येतील राममंदिर (ayodhya ram mandir) हा भाजपच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. ते राममंदिर उत्तरप्रदेशमधील अयोध्येतच आहे. अयोध्या हे शहर फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतं. हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. मात्र फैजाबादमध्ये समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद आघाडीवर आहेत.

स्मृती ईराणी पिछाडीवर 

मागच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी (Amethi) लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधींचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या खासदार स्मृती ईराणी यांचीही चिंता वाढली आहे. या मतदारसंघात स्मृती ईराणी (Smriti Irani) तब्बल ३३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांना १ लाख ४ हजार मतं मिळाली आहेत.

उत्तर प्रदेश गेल्या १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ६२ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी भाजपाला ६० ते ७५ जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेले निकाल हे एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा वेगळे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.