Lok Sabha Election 2024: भाजपाकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, पंकजा मुंडेंकडे नवीन जबाबदारी

गुरुवारी, २९ फेब्रुवारीला भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी १०० उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

167
Lok Sabha Election 2024 : हरियाणातील १० जागा जिंकण्यासाठी भाजपा मैदानात

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २३ लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गुरुवारी, २९ फेब्रुवारीला भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी १०० उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Maharashtra Life : शासकीय दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आंदोलन)

लोकसभा निवडणूक २०२४चं वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर केलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेदेखील आपल्या निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. भाजपाकडून २३ लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यावर निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.