Lok Sabha results : भाजपाला ध्रुवीकरणाचा फटका

142
Lok Sabha results : भाजपाला ध्रुवीकरणाचा फटका
Lok Sabha results : भाजपाला ध्रुवीकरणाचा फटका

लोकसभा २०१९ मध्ये राज्यातील भाजपाच्या (BJP) २३ जागा होत्या त्या आता एकअंकी, ९ वर आल्या म्हणजेच राज्यात भाजपाचा दारुण पराभव झाला आणि याची प्रांजळ कबुली राज्यातील भाजपाचा प्रमुख चेहेरा असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी निकालानंतरच्या दुसऱ्याच दिवशी दिली. (Lok Sabha results)

(हेही वाचा- Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात भाजपाला जागा का कमी मिळाल्या? कॅप्टन रिझवी यांनी सांगितली कारणे..)

राज्यात मतांच्या टक्केवारीत अर्ध्यापेक्षा कमी फरक

ही कबुली देत असताना फडणवीस यांनी मतांच्या टक्केवारीची आकडेवारी पत्रकार परिषदेत सादर केली. त्यानुसार महाविकास आघाडीला राज्यात झालेले मतदान ४३.९१ टक्के आहे तर भाजपाला झालेले मतदान ४३.६० टक्के, म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरक असल्याचे फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले. तर महाविकास आघाडीला एकूण मिळालेली मते २.५० कोटी असून महायुतीला २.४८ कोटी मिळाली म्हणजे २,०३,१९२ मते महाविकास आघाडीला अधिक मिळाली. इतक्या कमी मतांचा फरक असतानाही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ३० जागा तर महायुतीला (Mahayuti) केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागत आहे.  (Lok Sabha results)

मुंबईत मते वाढली

मुंबईबाबतही त्यांनी आकडेवारी सांगितली, त्यानुसार महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) २४.६२ लाख आणि महायुतीला २६.६७ लाख मते मिळाली म्हणजे महायुतीला २ लाख मते महायुतीला जास्त मिळाली आणि जागा ६ पैकी ४ महाविकास आघाडी आणि २ महायुतीला जिंकता आल्या. यांचे गणित मांडताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्या (Mahayuti) आठ जागा ४ टक्क्यापेक्षा कमी फरकाने तर ६ जागा ३०,००० पेक्षा कमी आणि काही जागा २,०००-४,००० फरकाने पराभूत झाल्या. (Lok Sabha results)

(हेही वाचा- BMC : धोकादायक इमारती आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणांवर तातडीने कार्यवाही )

शेतकरी, मराठा, ओबीसी मतांनी फिरवली पाठ

एकूणच भाजपाच्या (BJP) २०१९ च्या तुलनेत १४ लोकसभा जागा कमी झाल्या आणि त्या कॉँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. याला निश्चितच विविध कारणे आहेत. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मतांचे ध्रुवीकरण. भाजपाला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका बसल्याचे मराठवाड्यात दिसून येत आहे तर कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव न मिळाल्याने नाराज शेतकऱ्यांची अपेक्षित मते त्यात पुन्हा मराठा, ओबीसी मतेही भाजपापासून निसटली. भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषाणेनंतर विरोधी पक्षाने ‘संविधान बदलणार’ हा नरेटीव्ह सेट किंवा अपप्रचार केल्यामुळे दलित मंतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. (Lok Sabha results)

अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण

राज्यातच नव्हे तर देशभरात अगदी उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगाल, राजस्थानमध्येही मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण हा एक मोठा घटक महायुतीच्या पराभवास कारणीभूत ठरला, असे म्हणण्यास वाव आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणी झाल्यानंतर एक वेगळा संदेश आणि सुप्त असुरक्षिततेची भावना मुस्लिम समाजात वाढीस लागल्याची शक्यता, काही धर्मगुरूंचे फतवे मोबाइल, समाजमध्यमे या मार्गाने ‘योग्य’ ठिकाणी पोहोचले असण्याची चर्चा सुरू होतीच. मुंबईतही अल्पसंख्यांक मोहल्ल्यात मोठ्या प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण झाल्याने महाविकास आघाडी उमेदवारांना त्याचा फायदा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  (Lok Sabha results)

(हेही वाचा- अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा ‘अवकाशभरारी’)

कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण

हे झाले निवडणुकीच्या दरम्यानच्या प्रचारातील त्रूटीबाबत. मुळात, निवडणुकीत तीन पक्षांच्या भाजपा (BJP), शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी जागावाटपात झालेला गोंधळ आणि उमेदवार निश्चितीबाबतचा विलंब याचाही फटका महायुतीला बसल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांची आघाडी ही २०१९ ला झाली, त्यामुळे या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मागील पाच वर्षात आघाडीची मानसिकता तयार झाली होती तर महायुतीतील कार्यकर्त्याना वेळ कमी मिळाल्याने त्यांचा मानसिक गोंधळ उडल्याची शक्यता नाक्ररता येत नाही. त्यात पक्ष फोडाफोडी, नेत्यांची आवक आणि दुसऱ्या पक्षाचे उमेदवार लादणे, त्यांच्यावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अशीही विविध कारणे भाजपाच्या पराभवास कारणीभूत ठरलेली असू शकतात. परिणामी, मतांमध्ये फार फरक नसतानाही महायुतीला विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या आधी यावर प्रभावी तोडगा काढला गेला नाही तर राज्यातील सत्तापालट व्हायला वेळ लागणार नाही. (Lok Sabha results)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.