Lok Sabha Elections : वॅलेनटाईन डे ला एक मैत्री तुटण्याची शक्यता

इंडि आघाडीला बिहारनंतर उत्तर प्रदेशातही झटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय लोकदलाकडून समाजवादी पक्षासोबत असलेली आघाडी तोडण्याचे संकेत दिले आहेत.

280
Lok Sabha Elections : वॅलेनटाईन डे ला एक मैत्री तुटण्याची शक्यता

या फेब्रुवारी महिन्यात एक अतिशय जुनी दोन राजकीय नेत्यांची मैत्री तुटण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यासाठी १४ फेब्रुवारीचा दिवस नक्की झाल्याचेही सुत्राकडून समजते. ते दोन नेते म्हणजे उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – BMC : मुंबईतील उड्डाणपुलांवर बहरणार बोगनवेल)

जयंत चौधरी नाराज 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून असेलली अखिलेश आणि जयंत (Lok Sabha Elections) यांची ही मैत्री आता संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. अखिलेश यांनी चौधरी यांच्या पक्षाला सात जागा देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यानंतरही चौधरी नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपनेही चौधरी यांना पाच जागांची ऑफर दिली आहे. त्यावर चौधरी गांभीर्याने विचार करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

जयंत चौधरी एनडीएसोबत जाण्याची शक्यता 

अखिलेश यांनी दिलेल्या जागांबाबत (Lok Sabha Elections) काही अटी घातल्याचे समजते. त्यामुळे चौधरी हे एनडीएचा रस्ता धरू शकतात. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात येत आहे. त्याचदिवशी जयंत चौधरी एनडीएसोबत जाण्याची घोषणा करू शकतात. असे झाल्यास अखिलेश यांच्यासह इंडिया आघाडीसाठीही हा मोठा धक्का असेल.

(हेही वाचा – MNS : परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी)

जयंत चौधरी यांची साथ महत्वाची 

उत्तर प्रदेशातील राजकारणात जयंत चौधरी (Lok Sabha Elections) यांची साथ कोणत्याही पक्षासाठी महत्वाची मानली जाते. पश्चिम यूपीमध्ये जाट, मस्लिम आणि दलित मतदारांची संख्या अधिक आहे. या भागात लोकसभेच्या 23 जागा आहेत. त्यापैकी 12 जागांवर जाट मतदारांचा दबदबा आहे. हे मतदार आरएलडीला समर्थन देतात. त्यानंतर दलित व मुस्लिम मतदारांचा क्रमांक लागतो. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सपासोबत या भागात भाजपला (BJP) झटका दिला आहे. ते उत्तर प्रदेशात छोटे चौधरी म्हणून प्रसिध्द आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केले मनमोहन सिंह यांचे कौतुक)

इंडि आघाडीला बिहारनंतर उत्तर प्रदेशातही झटका 

इंडि आघाडीला बिहारनंतर उत्तर प्रदेशातही झटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर राष्ट्रीय लोकदलाकडून समाजवादी पक्षासोबत असलेली आघाडी तोडण्याचे संकेत दिले आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्याचे काही दिवसांपुर्वीच जाहीर केले आहे. तसेच आरएलडीला लोकसभेच्या सात जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्यानंतर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.