Lok Sabha Election Result : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला पुन्हा केले मोठे

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पुढे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत  (Lok Sabha Election Result) जिवंत ठेवले. या निवडणुकीत काँग्रेसला १५ जागा दिल्या. त्यातील काँग्रेसने चक्क १३ जागा जिंकल्या.

212
लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Result) पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला, सगळे एक्झिट पोल फोल ठरवणारे हे निकाल लागले. मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला मोठे केल्याचे दिसून आले आहे.

 २०१९मध्ये चौथ्या क्रमांकावर फेकलेल्या काँग्रेसला बनवले सत्ताधारी केले

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल  (Lok Sabha Election Result) घोषित होताच साल २०१९ च्या वेळीच्या काँग्रेसची अवस्था दिसून आली. २०१९ची नुकतीच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यावेळी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज भासणार हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या संपर्कात येऊन भाजपाला बाजूला करून काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपा पहिल्या क्रमांकावर होता, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना, त्या खाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अगदी चौथ्या क्रमांकावर काँग्रेस होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी युती तोडून दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करताच चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला काँग्रेस पक्ष थेट सत्ताधारी पक्ष बनला. उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर गेलेल्या काँग्रेसला मोठे केले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस बनला सर्वात मोठा

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पुढे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत  (Lok Sabha Election Result) जिवंत ठेवले. या निवडणुकीत काँग्रेसला १५ जागा दिल्या. त्यातील काँग्रेसने चक्क १३ जागा जिंकल्या. त्यामुळे ५ वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला काँग्रेस पक्ष त्याच उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे लोकसभा निवडणूक २०२४मध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.