Lok Sabha Election Result : सत्ता स्थापनेसाठी भाजपाचे संकटमोचक कोण?

एनडीएतील मित्र पक्ष टीडीपीचे चंद्राबाबू नायडू असो किंवा जनता दल युनायटेडचे नितीश कुमार या दोघांनी एनडीएमधून बाहेर पडून पुरोगामी लोकशाही आघाडीत पूर्वीच्या युपीएमध्ये आणि नंतरच्या इंडी आघाडीत प्रवेश केला होता. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत.

97
लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता (Lok Sabha Election Result) सर्वच एक्झिट पोल फोल ठरले. भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात भाजपा २५० पर्यंतच मजल मारू शकली. तर मित्र पक्षांच्या साहाय्याने भाजपा बहुमताचा आकडा गाठत आहे. मात्र भाजपाच्या मित्र पक्षांना आता इंडी आघाडीवाले खुणावू लागले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रांना सोबत घेऊन जाणारा संकटमोचक भाजपाला शोधावा लागणार आहे.

एनडीएच्या मित्रपक्षांना सोबत ठेवणे आव्हान 

एनडीएतील मित्र पक्ष टीडीपीचे चंद्राबाबू नायडू असो किंवा जनता दल युनायटेडचे नितीश कुमार या दोघांनी एनडीएमधून बाहेर पडून पुरोगामी लोकशाही आघाडीत पूर्वीच्या युपीएमध्ये आणि नंतरच्या इंडी आघाडीत प्रवेश केला होता. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. त्यामुळे हे दोघे मित्र पक्ष भरवश्याचे नक्कीच नाहीत. विशेष म्हणजे या दोघांच्या पक्षांच्या मदतीनेच भाजपा बहुमताचा जादुई आकडा गाठू शकणार आहे. अशा वेळी या दोन्ही मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपासाठी अमित शहा हे संकटमोचक ठरू शकतील, असे म्हटले जात आहे. (Lok Sabha Election Result)

‘अमित शहा पंतप्रधान होतील’  

नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून विश्लेषण केले आहे. ते म्हणाले की, ’लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result) पाहता भाजपा आणि एनडीए यांचा विचार केला तर आजचा दिवस चंद्र राशी मेष आहे आणि भाजपाचे संकटमोचक अमित शहा आहेत. त्यांची मेष रास आणि भरणी नक्षत्र आहे. त्यामुळे जे निकाल लागले आहेत, त्याअनुषंगाने येणारे पंतप्रधान अमित शहा असू शकतील, असे भाष्य वर्तवण्यास हरकत नाही.’

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.