Lok Sabha Election Result 2024: पंतप्रधान मोदींची विजयाची हॅट्रीक!

149
Lok Sabha Election Result 2024: पंतप्रधान मोदींची विजयाची हॅट्रीक!
Lok Sabha Election Result 2024: पंतप्रधान मोदींची विजयाची हॅट्रीक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांचा उत्तर प्रदेश च्या वाराणसी लोकसभा (Lok Sabha Election Result 2024) मतदारसंघातून (Varanasi Election Result) विजय झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अजय राय (Ajay Rai) यांच्यावर 152513 मतांनी विजय मिळवला आहे. आता नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result : पालघरमध्ये भाजपाचा दबदबा; भारती कामडी यांचा दारुण पराभव)

सुरूवातीला अजय राय यांनी पंतप्रधान मोदींना कडवी झुंज दिली होती. पंतप्रधान मोदी काही वेळ पिछाडीवर होते. परंतु हळूहळू मोदींनी आघाडी घेत विजयाची हॅट्रीक केली आहे. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी मोदींना कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना 6 लाख 11 हजार 439 मते मिळू शकली. तर गेल्या वेळी केवळ एक लाख 52 हजार 548 मते मिळवणारे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना यावेळी 4 लाख 59 हजार 084 मते मिळाली आहेत. पीएम मोदींनी अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 355 मतांनी पराभव केला आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष)

मागील दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून एकतर्फी विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांना केवळ 1 लाख 95 हजार 159 मते मिळाली. काँग्रेसचे अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये 5 लाख 81 हजार मते मिळाली होती. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा 2 लाख 9 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेससह अन्य पक्षांच्या एकाही उमेदवाराला एक लाख मतेही मिळवता आली नाहीत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.