Lok Sabha Election 2024 : रावेरमध्ये शरद पवार गटात नाराजी; एक दिवसापूर्वी पक्षात आलेल्याला दिली उमेदवारी 

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे.

114

रावेरमध्ये शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांनी गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. (Lok Sabha Election 2024)

संतोष चौधरी यांचे बंड

दरम्यान, एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा PM Narendra Modi: भोपाळच्या मशिदीत ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा; भाजपसाठी बोहरा मुस्लिम समाज का महत्त्वाचा?)

संतोष चौधरी नाराज

रावेर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर त्यातच उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन महिन्यात पक्षात बदल

रावेर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी दोन महिन्यांत भाजपसोडून शरद पवार गटाची वाट धरली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेल्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर भुसावळ, रावेर, वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.