Lok Sabha Election 2024 : सांगलीची उमेदवारी उबाठाला; तरीही विश्वजित कदम म्हणतात फेरविचार करा 

येत्या काळात आम्ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या भावना समजून घेणार आहोत, असे विश्वजित कदम म्हणाले.

64

सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Lok Sabha Election 2024) स्थानिक परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारीबाबत फेरविचार करावा, अशी मागणी सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केली आहे. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने फेरविचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष भक्कम असून लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे सांगलीमधील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची ही भावना असल्याचे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

मतदार संघाचा दौरा करणार 

येत्या काळात आम्ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या भावना समजून घेणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी लोकांची भावना समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले. त्यासाठी विशाल पाटील आणि मी मतदार संघाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयाला सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम यांनी कडाडून विरोध केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीत उभा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.  (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.