Lok Sabha Election 2024 Result : मतमोजणी आधी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांची कार्यशाळा

89
Lok Sabha Election 2024 : लोकसभेत क्षेत्रीय पक्षच 'दादा'च्या भूमिकेत

सलग दोन महिन्यातून अधिकचा काळ देशभरात निवडणुकीची हवा वाहत होती. आता मंगळवारी (४ जून) सर्वात महत्त्वाचा म्हणजे निकालाचा दिवस आहे. या निकालाच्या दिवशी सर्वात मोठी कसब पणाला लागते ती म्हणजे प्रवक्त्यांची. त्यामुळेच उद्याच्या निकालांना पाहता सोमवारी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची शाळा लागली होती. यामध्ये मंगळवारी आपल्या पक्षाच्या बाजूने निकाल लागला तर काय बोलावे व विरोधात गेला तर काय बोलावे यावरती चिंतन आणि मंथन झाल्याचे कळते. (Lok Sabha Election 2024 Result)

विविध वृत्तवाहिन्यांवरचे नियोजन

निकालाच्या दिवशी सर्वच वृत्तवाहिन्यांवरती विश्लेषणात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या पक्षाच्या वतीने कोणता प्रवक्ता कोणत्या वृत्तवाहिनीवर कोणत्या वेळेस जाईल याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. वृत्तवाहिन्यांवरती निकाला संदर्भात विश्लेषण कसे करावे किंवा आपल्या पक्षाची भूमिका कोणत्या पद्धतीत मांडावी या संदर्भात आजच्या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024 Result)

(हेही वाचा – Kedar Jadhav Retired : केदार जाधव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त)

प्रवक्त्यांचे लागणार कसब पणाला

निकालाचा दिवस हा तसा राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या राजकीय पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रवक्त्यांवर असते. त्यातच निकालाचे आकडे वर खाली आल्यास त्यास त्याच वेळी कसे उत्तर द्यावे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. विविध वृत्तवाहिन्यांवरती सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते एकाच वेळी हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे इतरही प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगून तशा प्रकारचे उत्तर देण्यासाठी तयारी करून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्या वृत्तवाहिनी वरती कोण प्रवक्ते किती वाजता पोहोचतील याचे देखील नियोजन करावे लागते. महत्त्वाच्या वृत्तवाहिन्यांवरती त्याच तोलामोलाचा प्रवक्ता हा पोहोचत असतो. तर इतर वृत्तवाहिन्यांवर त्याच तोला मोलाचे प्रवक्ते देखील पाठवावेच लागतात. यामुळेच निकालाचा दिवस हा प्रवक्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Lok Sabha Election 2024 Result)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.