Lok Sabha Election 2024 : वायनाडमध्ये राहुल गांधींची लिटमस टेस्ट

३ केंद्रीय मंत्री आणि २ माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, लोकसभा अध्यक्षही रिंगणात

101
Lok Sabha Election 2024 : वायनाडमध्ये राहुल गांधींची लिटमस टेस्ट
  • वंदना बर्वे

१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दोन माजी मुख्यमंत्री आणि तीन केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच टप्प्यात राजस्थानच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचे भवितव्यही जनता ठरवणार आहे. राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तिसऱ्यांदा कोटामधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि टीव्हीतील ‘राम’ अरूण गोविल यांचे भविष्यसुध्दा मतपेटीत बंद होणार आहे. ड्रीमगर्ल मथुरेतून तर अरुण गोविल मेरठमधून मैदानात आहेत. (Lok Sabha Election 2024)

पहिल्या टप्प्यात २१ राज्यातील १०२ जागांवर मतदान झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष आता दुसऱ्या टप्प्याकडे लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. २४ एप्रिलच्या सायंकाळी प्रचार थांबेल. यावेळी १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होणार आहे. एकूण १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील हाय-प्रोफाइल जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे, हे विशेष. (Lok Sabha Election 2024)

वायनाड लोकसभा जागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी वायनाडमधून पराभूत होणार असल्याचे विधान केल्यापासून ही जागा अधिक संवेदनशील झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व २० लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. यापैकी एक जागा वायनाड आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्यांदा येथून निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी ४,३१,७७० मतांनी विजय मिळवला होता. (Lok Sabha Election 2024)

राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महिला उमेदवार ॲनी राजाला उभे केले आहे. दरम्यान, पीआर कृष्णकुट्टी हे बहुजन समाज पक्षाकडून (बसपा) निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींच्या विरोधात भाजपाने सुरेंद्रन यांना उतरविले आहे. वायनाडमध्ये पाच अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

राजनांदगाव लोकसभा जागा

छत्तीसगडमधील राजनांदगावची जागा दुसऱ्या टप्प्यातील हाय-प्रोफाइल जागांपैकी एक आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने येथून तिकीट दिले आहे. दुर्गचे रहिवासी असलेल्या बघेल यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. भाजपाने संतोष पांडे यांना भूपेश यांच्या विरोधात उतरविले आहे. बसपाने देवलाल सिन्हा यांना येथे उमेदवारी दिली आहे. राजनांदगावमधून सात अपक्षांसह एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

मंड्या लोकसभा जागा

कर्नाटकच्या मंड्या लोकसभा जागेवर माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. कुमारस्वामी यांचा पक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासोबत युती करत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने व्यंकटरमण गौडा यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी सात अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

तिरुवनंतपुरम लोकसभा जागा

केरळच्या तिरुअनंतपुरमच्या जागेचीही देशभरात चर्चा आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांची स्पर्धा काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याशी आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पन्न्यान रवींद्रन यांना तिकीट दिले आहे. बसपाचे अधिवक्ता राजेंद्रन हेही निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. येथून सात अपक्षांसह एकूण १२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

जोधपूर लोकसभा सीट

राजस्थानच्या जोधपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शेखावत यांना बसपाच्या मंजू मेघवाल आणि काँग्रेसकडून करणसिंग उचिराडा यांचे आव्हान आहे. जोधपूर मतदारसंघासाठी सहा अपक्षांसह एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

कोटा लोकसभा जागा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून विजय मिळवला होता. काँग्रेसने ओम बिर्ला यांच्यासमोर प्रल्हाद गुंजाळ यांना तिकीट दिले आहे. बसपाचे धनराज यादवही नशीब आजमावत आहेत. या जागेसाठी नऊ अपक्षांसह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – IPL 2024, Yashaswi Jaiswal : शतक झळकावल्यानंतर यशस्वी जयस्वाल जेव्हा ब्रायन लाराकडे धावत जातो…)

गौतम बुद्ध नगर लोकसभा जागा

सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर लोकसभा जागेवर लागल्या आहेत कारण माजी केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पक्षाने (एसपी) डॉ महेंद्रसिंग नगर यांना तिकीट दिले आहे. बसपकडून राजेंद्रसिंह सोलंकी हे उमेदवार आहेत. येथून चार अपक्षांसह एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

अटिंगल लोकसभा जागा

केरळच्या अटिंगल लोकसभा जागेवर केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अदूर प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे अधिवक्ता व्ही जॉय आणि बसपाचे अधिवक्ता सुरभी एस आपले नशीब आजमावत आहेत. या जागेवर तीन अपक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

झालावार-बारा लोकसभा जागा

राजस्थानमधील झालावाड-बारा लोकसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ पासून आतापर्यंत वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह येथून खासदार आहेत. दुष्यंत सिंह चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने उर्मिला जैन आणि बसपाने चंद्रसिंग किरार यांना उमेदवारी दिली आहे. येथे तीन अपक्षांसह एकूण सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

जालोर लोकसभा जागा

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हे राजस्थानमधील जालोर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. वैभव यांच्या विरोधात भाजपाने लुंबाराम यांना उमेदवारी दिली आहे. सहा अपक्षांसह १२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मथुरा लोकसभा जागा

उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आहे चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी. मथुरा मतदारसंघातून भाजपाने तिसऱ्यांदा हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे. तिने दोनदा येथून विजयही मिळवला आहे. हेमा मालिनी यांना काँग्रेसचे मुकेश धनगर आणि बसपाचे सुरेश सिंह यांचे आव्हान आहे. मथुरा मतदारसंघातून १० अपक्षांसह एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मेरठ लोकसभा जागा

रामायणातील ‘राम’ अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर सपाने सुनीता वर्मा यांना तर बसपाने देवव्रत कुमार त्यागी यांना उमेदवारी दिली आहे. येथून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

म्हैसूर लोकसभा जागा

कर्नाटकातील म्हैसूर लोकसभा जागेवर भाजपाने राजघराण्यातील माजी सदस्यावर विश्वास व्यक्त केला आहे. यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांचे प्रदेश प्रवक्ते एम लक्ष्मण यांना त्यांच्यासमोर उभे केले आहे. या जागेसाठी आठ अपक्षांसह १८ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – IPL 2024 Marcus Stoinis : लखनौच्या मार्कस स्टॉईनिसने आयपीएलचा १३ वर्ष जुना विक्रम मोडला)

बेंगळुरू दक्षिण लोकसभा जागा

बेंगळुरू दक्षिण लोकसभा जागेवर भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेजस्वी यांनी मागची निवडणूक येथून जिंकली होती. काँग्रेसने सौम्या रेड्डी यांना येथे तिकीट दिले आहे. या जागेसाठी १२ अपक्षांसह एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

पूर्णिया लोकसभा जागा

बिहारची पूर्णिया लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) येथे विमा भारती यांना उमेदवारी दिली आहे. पप्पू यादव यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती. पण राजदसोबत चर्चा झाली नाही. आता या जागेवरून राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. बसपाकडून अरुण दास रिंगणात आहेत. येथे एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.