Lok Sabha Election 2024 : सोलापूरमधून वंचितच्या उमेदवाराची माघार; वंचित बहुजन आघाडीला धक्का

वंचित बहुजन आघाडीची स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने राहुल गायकवाड यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे बोलले जाते.

125
Vanchit Bahujan Aghadi च्या उमेदवाऱ्या महायुतीच्या पथ्यावर

मला युद्धाच्या मैदानात उतरविण्यात आले. लढण्यासाठी बंदुकही देण्यात आली. पण त्या बंदुकीत गोळ्याच नाहीत, अशी खंत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदासंघातील अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. गायकवाड यांच्या माघारीने वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून आता सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम शिंदे यांच्यात सरळ लढत होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सोलापूरसह ११ मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत राहुल गायकवाड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वंचित बहुजन आघाडीची स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्या या निर्णयामुळे आता सोलापुरातील निवडणुकीचे गणित बदलणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये १ लाख ७० हजार मते घेतली होती. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Veer Savarkar : क्रांतिवीर भगतसिंग यांनी खरंच वीर सावरकर यांची भेट घेतली होती का?)

या भावना व्यक्त करत राहुल गायकवाडांनी घेतला अर्ज मागे 

मला युद्धाच्या मैदानात उतरवण्यात आले, बंदुकही देण्यात आली. पण त्या बंदुकीत गोळ्याच नाहीत. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी सोलापूरला आलो, इथे आल्यानंतर माझी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. सोलापूरच्या जनतेलाही मी भेटलो. गेल्या पंधरा दिवसात मी खूप काही अनुभवले आहे. मी जे अनुभवले ती चळवळ नाही. सोलापुरातील भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे. पण मला समजले की, चळवळीसाठीची फळी पोकळ आहे. ही फळी पोषक नाही, अशा भावना राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना व्यक्त केल्या. (Lok Sabha Election 2024)

मी जर अर्धवट लढलो तर भाजपाच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असे वाटेल. भाजपाच्या उमेदवाराला सोईचे वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण होईल असे माझ्याकडून काहीही होऊ नये असे मला वाटते, असेही राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.