Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात २ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार मतदान करणार!

124
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात २ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार मतदान करणार!
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात २ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार मतदान करणार!

उत्तर प्रदेशातील 14 लोकसभा (Lok Sabha Election 2024) जागांसाठी शनिवारी (25 मे) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सहाव्या टप्प्यातील सुलतानपूर, प्रतापगड, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीरनगर, लालगंज, आझमगड, जौनपूर, मच्छलीशहर आणि भदोही जिल्ह्यातील १४ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात दोन कोटी ७० लाख ६९ हजार ८७४ मतदार १६२ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा (Navdeep Rinwa) यांनी सांगितले की, “सहाव्या टप्प्यातील मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले असून, ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.” (Lok Sabha Election 2024)

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा (Navdeep Rinwa) यांनी सांगितले की, “सहाव्या टप्प्यातील मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले असून, ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. जे मतदार मतदान केंद्रावर रांगेत उभे राहतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.” (Lok Sabha Election 2024)

उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

सहाव्या टप्प्यात एकूण 2 कोटी 70 लाख 69 हजार 874 मतदार असून त्यापैकी 1 कोटी 43 लाख 30 हजार 361 पुरुष आणि 1 कोटी 27 लाख 38 हजार 257 महिला मतदार आहेत. 1,256 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदारसंख्येचा विचार करता सर्वाधिक मतदार संत कबीरनगरमध्ये आहेत, तर सर्वात कमी मतदार अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत. (Lok Sabha Election 2024)

मतदान केंद्रावर मतदारांसाठी व्यवस्था

नवदीप रिनवा (Navdeep Rinwa) म्हणाले की, अति उष्मा आणि उष्णतेची लाट टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर थंड पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, अपंग व वृद्धांसाठी व्हील चेअर व खुर्च्यांची व्यवस्था आहे. मतदान केंद्र परिसरात मतदारांच्या रांगेसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. पॅरामेडिक्स आणि आशा कार्यकर्त्या प्रत्येक मतदानाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ORS आणि वैद्यकीय किटसह उपस्थित राहतील. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.