Lok Sabha Election 2024: सहाव्या टप्प्यात सर्वाधिक मतदान, पश्चिम बंगाल अव्वल स्थानी

126
Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

लोकसभा निवडणुकीचा ५वा टप्पा सोमवार, २०मे रोजी पार पडला. सहाव्या टप्प्यात ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांसाठी शनिवारी, (२५ मे) सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५८ जागांवर ५८.८२ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७८.१९% आणि सर्वात कमी जम्मू आणि काश्मीरमध्ये ५१.४१% मतदान झाले. ५ टप्प्यात ४२९ जागांवर मतदान झाले. शेवटच्या ५६ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

पश्चिम बंगालमधील झारग्राममधील भाजप उमेदवार प्रणंत तुडू यांच्यावर हल्ला करण्यात आला. दगड लागल्याने त्याचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. मतदारांना धमकावल्याची तक्रार मिळाल्यानंतर तुडू गडभेटा येथील एका बूथला भेट देत होते. प्रणत तुडू यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. भाजपाने टीएमसीवर हल्ल्याचा आरोप केला आहे. यावर निवडणूक आयोगाने सांगितले – मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांचे एजंट स्वाक्षरी करतात. या केंद्रांवर टीएमसी एजंट उपस्थित नव्हते, त्यामुळे फक्त भाजपा एजंटांच्या सह्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Nashik: नाशिकमध्ये २२ तास वीजपुरवठा खंडित, अभियंत्यांच्या ‘या’ उत्तरामुळे संतप्त नागरिकांनी सबस्टेशनला ठोकले टाळे )

पश्चिम बंगालमधील तमलूकमध्ये मतदानापूर्वी भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत टीएमसी समर्थक जखमी झाला. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश येथून भाजपचे उमेदवार आहेत. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी येथील पीडीपीच्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती संपावर बसल्या. ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आणि मोबाईलचे आउटगोइंग कॉल ब्लॉक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२०१९मध्ये, भाजप ४०, बसपा ४, बीजेडी ४, सपा १, JDU ३, TMC ३, LJP आणि AJSU प्रत्येकी १ जागा जिंकल्या. काँग्रेस आणि आपला एकही जागा मिळाली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.