Lok Sabha Election 2024 : वंचितची उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; मुंबई, पालघर, रायगडमध्ये कोण लढवणार निवडणूक?

154
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड – कुमुदानी रविंद्र चव्हाण, उस्मानाबाद – भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, नंदूरबार – हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी, जळगाव – प्रफुल कुमार रायचंद लोढा, दिंडोरी – गुलाब मोहन बरडे, पालघर – विजया म्हात्रे, भिवंडी – निलेश सांबरे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी चर्चा सुरू होती. पण, जागावाटपावरुन चर्चा होऊ झाल्या नाहीत. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडी राज्यात स्वतंत्र लढणार आहे. (Lok Sabha Election 2024)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.