Lok Sabha Election 2024 : रायबरेलीमधून गांधींना हद्दपार करणार, स्मृती इराणींना विश्वास

प्रियंका गांधी निवडणूक लढवतील, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, भाजपकडून आता अमेठीपाठोपाठ रायबरेलीही काँग्रेसच्या हातातून खेचून आणण्याचा दावा केला जात आहे. स्मृती इराणी यांनी तसे संकेत दिले.

112
Lok Sabha Election 2024 : रायबरेलीमधून गांधींना हद्दपार करणार, स्मृती इराणींना विश्वास

रायबरेलीच्या खासदार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. प्रियंका गांधी निवडणूक लढवतील, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, भाजपकडून आता अमेठीपाठोपाठ रायबरेलीही काँग्रेसच्या (Congress) हातातून खेचून आणण्याचा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेश मधील राजकीय पारा चांगलाच चढला आहे. कारण भारतीय जनता पक्षांने (BJP) उत्तर प्रदेश मधील रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील एकाही व्यक्तीला जिंकू देणार नाही, असा निर्धार केला असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या गांधी कुटुंबाला केलेल्या Challenge वरून स्पष्टपणे जाणवते. यामुळे रायबरेली हा एकमेव मतदारसंघ गांधी कुटुंबाच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

आतापर्यंत अमेठी आणि रायबरेली वासियांसाठी गांधी कुटुंबाने काहीच केले नसल्याचा आरोप इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. तसेच देशात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्राही नुकतीच उत्तर प्रदेशात होती. त्यातच केंद्रीय मंत्री व अमेठीच्या खासदार स्मृती इराणी याही मतदारसंघात होत्या. या वेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा अमेठीतून लढण्याचे आव्हान दिले. रायबरेलीच्या खासदार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Ramesh Chennith : मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; २७ व २८ फेब्रुवारीला निर्णय:- रमेश चेनिथल्ला.)

प्रियंका गांधी निवडणूक लढवतील, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, भाजपकडून आता अमेठीपाठोपाठ रायबरेलीही काँग्रेसच्या (Congress) हातातून खेचून आणण्याचा दावा केला जात आहे. स्मृती इराणी यांनी तसे संकेत दिले. त्या म्हणाल्या, जे लोक अमेठीला सत्ताकेंद्र मानत होते, ते अमेठीत आल्यानंतर लोक फिरकलेही नाहीत. वायनाडमध्ये गेल्यानंतर उत्तर भारतातील विशेषत: अमेठीतील लोकांची समज कमी असल्याचे हा व्यक्ती म्हणाल्याचे लोक विसरले नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत लोकांमध्ये आक्रोश आहे, त्यामुळे रायबरेलीची जागा कुटुंबाला सोडावी लागली. (Lok Sabha Election 2024)

राहुल यांची यात्रा अपयशी

अमेठीतील रिकाम्या रस्त्यांवरून हेच दिसते की, राहुल यांची यात्रा अपयशी ठरली आहे. राहुल यांनी अमेठी सोडले आणि अमेठीने त्यांना. आम्ही पाच वर्षांत जे काम केले, ते त्यांच्या ५० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या वेळी आम्ही अमेठीसह रायबरेलीतही विजय मिळवू, असा विश्वास इराणींनी (Smriti Irani) व्यक्त केला. दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ रायबरेली मतदारसंघात विजय मिळाला होता. अमेठीमध्ये इराणी यांनी राहुल यांचा तब्बल ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. राहुल गांधी सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी वायनाडमधून निवडणूक न लढता अमेठीतून लढावी, असे आव्हान इराणींनी दिले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.