Bihar : बिहार पोलिसांचा भाजप नेत्यांवर लाठीचार्ज; एका नेत्याचा मृत्यू

123

बिहार विधानसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेत एका भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटणा येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. जहानाबाद शहरात झालेल्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याप्रकरणी नितीश सरकारला घेरले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे. नड्डा म्हणाले, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि रागाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडून आरोपपत्र झालेल्या व्यक्तीला वाचवले आहे. याआधी गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप सदस्यांनी वेल येथे पोहोचून सरकारला घेराव घातला आणि निदर्शने केली, त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रॅली काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. नितीश सरकारच्या विरोधात भाजपने गुरुवारी विधानसभेत मोर्चा काढला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बडतर्फ करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भाजपने भ्रष्टाचार, रोजगार आणि शिक्षक नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत सभागृहाची वेल गाठली. भाजपने विधानसभेतून सभात्याग केला, नंतर भाजप आमदार जीवेश मिश्रा आणि शैलेंद्र यांना सभापतींच्या सूचनेवरून सभागृहाबाहेर हाकलण्यात आले.

(हेही वाचा एनसीपीमध्ये पुन्हा खळबळ, ‘हा’ नेताही सोडणार शरद पवारांची साथ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.