लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही ; DCM Eknath Shinde यांचा लाडक्या बहिणींना दिलासा

लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही ; DCM Eknath Shinde यांचा लाडक्या बहिणींना दिलासा

28
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही ; DCM Eknath Shinde यांचा लाडक्या बहिणींना दिलासा
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही ; DCM Eknath Shinde यांचा लाडक्या बहिणींना दिलासा

महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजने (DCM Eknath Shinde) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. आतापर्यंत ११ हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान ही योजना बंद पडणार का ? या योजनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे का ? अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (DCM Eknath Shinde) पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा-पावसाळी वेळापत्रकामुळे १५ जूनपासून Konkan Railway चा वेग कमी होणार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठीची आर्थिक तरतूद आहे, ती सरकारनं केलेली आहे. दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे. संतांच्या लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे. तिथल्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो’, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते जळगावात बोलत होते. (DCM Eknath Shinde)

हेही वाचा- छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ७ Naxalites ठार, २०२५ मध्ये बस्तरमध्ये १८० हून जणांचा खात्मा

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याचा ४१० कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याची माहिती समोर आली होती. तसेच मागच्या महिन्यात देखील आदिवासी खात्याच्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी वापरला असल्याची माहिती माध्यमांमध्ये झळकली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना पुरेसा निधी देत नसल्याची खंत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती. या सगळ्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता संजय शिरसाटांनी काढता पाय घेतला. इतकंच नाही तर शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का ? असा सवाल केल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यम प्रतिनिधीना हात जोडले. (DCM Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.