महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) खूपच लोकप्रिय ठरली. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, एक मोठी अपडेट समोर येत आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा-Mumbai पोलिसांना मिळणार डिजिटल स्मार्ट ओळखपत्र
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा- Muslim : मोहसीनच्या मारहाणीने निदा इस्लामलाच कंटाळली; मंदिरात धर्मांतर करून वैदेही बनली
माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा- Tree : ‘एक झाड हुतात्मांच्या नावे’; ३१ मे ला आरेमध्ये वृक्षारोपण
ऑगस्ट २०२४ पासून एप्रिलपर्यंत म्हणजे ९ महिन्यांत प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये घेतले. याचा अर्थ ३ कोटी ५८ लाखांची कमाई त्यांनी केली. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा- मुंबईतला सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला Crime Branch कडून अटक
८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये महिन्याकाठी उचलले. त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी सहा हजार (एकूण १२ हजार रु.) घेतले. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना ३० हजार रुपये मिळाले. आता ज्या २,६५२ महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता या रकमेची (३ कोटी ५९ लाख रु.) वसुली करण्यात येणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community