मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लागून राहिलेली होती. आता लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. एक्स पोस्ट करत आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025
आदिती तटकरे म्हणाल्या, “लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आज पासून सुरुवात झाली आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.”
हेही वाचा-Surajya Abhiyan : शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभरात अंमलबजावणीची मागणी
अकराव्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरु झाल्यापासून 16500 रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये दोन महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community