केंद्र सरकार केनिया, दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना यांच्याशी चित्त्यांच्या पुढील तुकडीचे मध्य प्रदेशात स्थलांतर करण्यासाठी चर्चा करत असताना, चित्ता प्रकल्प सुकाणू समितीने कुनो राष्ट्रीय उद्यानातून (kuno national park) गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात काही चित्तांचे स्थलांतर करण्यास मंजुरी दिली आहे. (kuno national park)
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की २० एप्रिलला हे स्थलांतर केले जाईल. सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ चित्ते मोकळ्या जंगलात असून त्यापैकी नऊ चित्ते पिंजऱ्यांमध्ये आहेत. चित्त्यांच्या आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. किती चित्ते स्थलांतरित केले जातील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात दोन चित्ते शेवपूर जिल्ह्यात पाठवले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांनी शुक्रवारी यादव आणि राज्यातील अधिकाऱ्यांबरोबर चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला. (kuno national park)
गांधी सागर वन्यजीव अभयारण्य हे चित्त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी एक महत्त्वाचा दुवा म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे, ज्याचा उद्देश मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पसरलेल्या कुनो-गांधी सागर लँडस्केपमध्ये 60-70 चित्त्यांची मेटापोपुलेशन स्थापित करणे आहे. (kuno national park)
हेही वाचा- Mumbai-Thane महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युती होणार!
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मे २०२३ मध्ये चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना प्रकल्पाचा आढावा आणि देखरेख करण्यासाठी आणि सल्लागार संस्था म्हणून काम करण्यासाठी केली होती. (kuno national park)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community