कुंभारवाडा गोल देऊळ वाद पेटला! मंदिराबाहेर काँग्रेस आमदाराचा फोटो लावल्याने BJP चा आक्रमक इशारा; भक्तांमध्ये तीव्र संताप

138
कुंभारवाडा गोल देऊळ वाद पेटला! मंदिराबाहेर काँग्रेस आमदाराचा फोटो लावल्याने BJP चा आक्रमक इशारा; भक्तांमध्ये तीव्र संताप
  • प्रतिनिधी

मुंबईतील कुंभारवाडा येथील प्रसिद्ध गोल देऊळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पवित्र मंदिराबाहेर काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याने, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा (BJP) युवा मोर्चाचे कार्यकर्ते सनी सानप यांनी या प्रकाराला जोरदार विरोध करत, “हे मंदिर कोणाचं खासगी मालमत्ता नाही!” असा थेट इशारा दिला आहे.

(हेही वाचा – School Timing : राज्यात शाळांच्या वेळेत मोठा बदल! आता सकाळी ७ ऐवजी ९ वाजता …)

भाविकांमध्ये संताप, राजकीय संघर्षाची शक्यता

गोल देऊळ हे मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून, रोज शेकडो भाविक येथे महादेवाचे दर्शन घेतात. अशा पवित्र जागेच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिक आमदाराचा राजकीय फोटो लावल्याने अनेक भक्त नाराज झाले आहेत. “देवळात दर्शनासाठी येतो, राजकीय प्रचारासाठी नाही,” असा सूर भक्तांमध्ये उमटत आहे.

या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, काँग्रेस व भाजपा (BJP) यांच्यात संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत. भाजप युवा मोर्चाचे स्थानिक कार्यकर्ते सनी सानप यांनी “धार्मिक स्थळावरून राजकारण बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू” असा इशारा दिला आहे.

(हेही वाचा – गाझाला मदत करणाऱ्या Greta Thunberg वर इस्रायलची मोठी कारवाई; एक्सवर फोटो पोस्ट)

काय आहे भाविकांची मागणी?

भाविक व स्थानिक नागरिकांनी मंदिराच्या समोरून आमदार अमिन पटेल यांचा फोटो तात्काळ काढून टाकावा आणि तो इतर ठिकाणी लावावा, अशी ठाम मागणी केली आहे. “गोल देऊळ हे श्रद्धेचे स्थान आहे, कोणत्याही पक्षाचा प्रचाराचा अड्डा नव्हे,” असं स्पष्ट मत अनेक भक्तांनी मांडलं आहे.

गोल देऊळ परिसरात काँग्रेस आमदाराचा फोटो लावल्यामुळे निर्माण झालेला वाद केवळ धार्मिक भावनांचा मुद्दा न राहता आता राजकीय संघर्षाचे रूप घेण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढला नाही, तर कुंभारवाडा परिसरात नव्या वादाला तोंड फुटू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.