Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या जनजागृतीसाठी कोल्हापूरकर ‘धावले’

६३५९ जणांनी घेतलेल्या धावेची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

221
Kolhapur : मतदानाच्या जनजागृतीसाठी कोल्हापूरकर ‘धावले’

“चला धावूया-सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी” हे ब्रीद वाक्य असलेल्या मतदार राजाने जनजागृतीसाठी ‘ स्वीप ‘ (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) अंतर्गत ‘रन फॉर व्होट’ (Run For Vote) या लोकशाही मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. “रन फॉर वोट” लोकशाही दौडमध्ये ६ हजार ३५९ नागरिक सहभागी झाले. या विक्रमी दौडची नोंद आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमधे (Wonder Book of Records) झाली. पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, युवती, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

दौडच्या आयोजनात स्वीपचे नोडल अधिकारी नीलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट यांचा सहभाग होता. सकाळी ६.३० वाजता १० कि.मी., ६.४० वाजता ५ कि.मी. आणि ६.५० वाजता ३ कि.मी. ची दौड सुरु झाली. शेवटी दिव्यांगांच्या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ‘मी मतदान करणारच’ अशा संदेशांचा टीशर्ट धावपटूंनी परिधान केला होता. प्रारंभी मतदान करण्याची शपथ सर्वांनी घेतली. (Lok Sabha Election 2024 )

हेही वाचा – Mumbai Indians चा IPL मधील पहिला विजय

या मेरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. यानंतर स्वत:ही दौडमधे भाग घेतला. त्यांनी तब्बल १० किमीची धाव पूर्ण करीत आदर्श निर्माण करुन दिला. विशेष म्हणजे या मेरेथॉनमध्ये दिव्यांग, जेष्ठ धावपटूंही सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डशी संबंधित संस्थेकडून नोंदीचे सन्मानपत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.