सोमय्यांना अटक होणार, मंगळवारी नीलचा फैसला

117

‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरला, असा गंभीर आरोप शिबसेना नेते संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स बजावला. या दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन नाकारला, नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी, १२ एप्रिल रोजी निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अटकेसाठी मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा शोध सुरु केला आहे. मात्र सोमय्या हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, असे समजते.

पोलिसांकडून अटकेची तयारी सुरु

आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात राज्य सरकारला पुरावे दिले. त्यानुसार आर्थिक गैरव्यवहार विरोधी विभागाने याची दखल घेत सोमय्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स पाठवला आहे. या समन्सनुसार, किरीट सोमय्या यांना 9 एप्रिल रोजी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र सोमय्या आलेच नाही. त्यांनी सोमवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. दुसरीकडे पोलिसांनीही सोमय्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.

(हेही वाचा हल्ल्याआधी मिटींग, नागपूरहून आला फोन… सदावर्तेंबाबत न्यायालयात धक्कादायक खुलासे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.