कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; काँग्रेस, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

117

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक मतदारसंघातील निवडणूक झाल्यानंतर आता कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. सध्या राज्यात कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले आणि राज ठाकरे यांना फोन करून उमेदवार न देण्याचे आवाहन केले आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ‘कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोधी होण्याचे कारण नाही. कोल्हापूर आणि पंढपूरची पोटनिवडणूक बिनविरोधी भाजपने केली नाही. शिवाय देगलूरची निवडणुकही बिनविरोधी झाली नाही. एकच मुंबईची निवडणूक बिनविरोधी झाली. बाकीच्या पोटनिवडणुकी बिनविरोधी होतील, हे डोक्यातून काढून टाकावे. शेवटी लोकशाही असून जनता हवं त्याला निवडणूक देईल.’ (हेही वाचा – राज्य लोककला महामंडळाबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

सोमवारी काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘आम्ही सोमवारी सकाळी ९.३० वाजता कसबा पेठ गणपतीच्या समोर जमणार आहोत. मग गणपतीची आरती करून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरणार आहे, असा आमचा सोमवारी कार्यक्रम असणार आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.